कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रणदुल्लाबाद गावात आजपासून नो एन्ट्री

427
Adv

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील रणदुल्लबाद गाव २० एप्रिल ते १ मे पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात गावातील सर्व व्यवहार व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. गावाबाहेरील व्यक्तींना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. करोना ग्राम कृती समितीने घेतलेल्या या निर्णयास ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे.

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात करोनाने हातपाय पसरले असून, अनेक गावांत मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडत आहेत. रणदुल्लाबादमध्ये सध्या १२ ते १४ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. ही भयावह आकडेवारी पाहता गाव करोनामुक्त करण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय ग्रामपंचायत व करोना ग्रामसुरक्षा कृती समितीने घेतला आहे. गाव बंद करायच्या निर्णयास ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा
दिला. या कालावधीत किराणा माल व भाजीपाला ग्रामस्थांना घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Adv