कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार सुरू करण्याबाबत राजवंश प्रतिष्ठानने दिले प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

324
Adv

कोरेगाव तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करण्यासाठी राजवंश आठवडा बाजार संघटनेच्या माध्यमातून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी कोरेगाव तालुक्यातील आठवडे बाजार हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले आहेत परंतु सातारा जिल्ह्यातील चारच तालुक्यांमधील हे आठवडे बाजार बंद झाल्याने हातावरचे पोट असणाऱ्या आठवडे बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरसोय झाल्याचे चित्र दिसून येत आहे यातच आज माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक जयवंत पवार मित्र समूह व राजवंश आठवडा बाजार संघटनेतर्फे कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना भेटून संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले

तसेच कोरेगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनाही निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने 12 मार्च पर्यंत शासनाने जारी केलेल्या आदेश आठवडे बाजारातील व्यापारी हे पालन करणार असून तद्नंतर 13 मार्च पासून कोरेगाव तालुक्यातील आठवडे बाजार हे सुरू करण्यात यावेत व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंग मास्कचे व सॅनिटायझर चा वापर करण्यात येईल असे संघटनेतर्फे सांगण्यात आले यावेळी तालुक्यातील आठवडा बाजार करणारे नागरिक प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होते राजवंश आठवडे बाजार संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे प्रांताधिकारी ज्योती पाटील यांना आपले म्हणणे मांडण्यात आले त्यानंतर प्रांतधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले की आपले म्हणणे ऐकून विचार करण्यात येईल व ही चर्चा सकारात्मक दृष्ट्या पार पडली. यावेळी आठवडा बाजार करणारे नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Adv