खासदार उदयनराजे समर्थकांचा भाजपने केला जिल्हा कार्यकारणीत स्थान देऊन सन्मान

139
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना भाजपने राज्यसभेवर घेऊन सन्मान केला त्याप्रमाणेच त्यांच्या कार्यकर्त्यांना ही आज भाजप पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे

सातारा भाजप जिल्ह्याच्या वतीने आज विविध निवडी पार पडल्या यामध्ये प्रामुख्याने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे गटाचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर नगराध्यक्ष माधवी कदम यांना जिल्हा कार्यकारिणीत स्थान देऊन सन्मानित करण्यात आले आहे जवळपास 80 सन्माननीय लोकांची जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सातारानामाशी बोलताना दिली

जिल्हा कार्यकारिणीत सुनील काटकर यांची वर्णी लागल्याने त्यांना राजकारणाचा बराच अनुभव असून याचा फायदा नक्कीच भाजप पक्षाला होईल यात तिळमात्र शंका नाही सातारच्या नगराध्यक्षा माधवीताई कदम यांनाही आता जिल्हा पातळीवर काम करता येणार आहे

Adv