Wednesday, September 23, 2026
spot_img
Home Satara District भाजपा युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष मयुर शिवतारे यांचा खून

भाजपा युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष मयुर शिवतारे यांचा खून

249
Adv

धनगर वाडी तालुका खंडाळा गावच्या हद्दीतील मोठे वस्तीजवळ दोन गटात तुंबळ हाणामारी भाजप युवा मोर्चा माजी अध्यक्ष शिवतरे यांना तलवारीने सपासप वार करून खून करण्यात आला आहे व दोघे जखमी गंभीर आहेत.खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद उर्फ मारुती मोटे हे कुटुंबासह हायवेरोड नजीक मोटे वस्ती जवळ राहत आहेत.मकरंद मोटे यांचा मुलगा अनिकेत मोटे व मयूर शिवतरे यांच्यामध्ये दूरध्वनीवरून शाब्दिक चकमक झाली होती.

रात्री दहा वाजता सुमारास मयूर शिवतारे हा काही लोकांसमवेत मोटे वस्ती जवळ आला व त्यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.यामध्ये तलवारीे व घातक शास्त्राचा वापर झाला. मयूर शिवतारे यांच्या वर सहा-सात वार झाले. तो गंभीर जखमी झाला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या मयूर शिवतारे याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रवी मोटे व योगेश मोटे हे गंभीर जखमी झाले आहेत.
शिरवळ खंडाळा लोणंद पोलिसांनी धाव घेतली व अधिक तपास शिरवळ पोलिस करीत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते,पोलीस उपाधिक्षक तानाजी बर्डे, व धीरज पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली आहे.अधिक तपास पो.नि.उमेश हजारे करीत आहेत.

Adv