Sunday, April 26, 2026
spot_img
Home Satara District Maan म्हसवड शहरात 27 नाव्हेंबर रोजी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश

म्हसवड शहरात 27 नाव्हेंबर रोजी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश

225
Adv

म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रेचा 27 नोव्हेंबर हा मुख्य दिवस असल्याने कायदा व सुव्यवस्था
अबाधित ठेवण्यासाठी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142(1) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल सातारा यांनी म्हसवड शहरातील सर्व देशी दारु विक्री, बिअर विक्रीपरवाने, (एफएलबिआर-2), विदेशी मद्य विक्री (एफएल-2), परवानाकक्ष (एफएल-3),बिअर बार (फॉर्म इ) व ताडी दुकान टिडी-1 या अनुज्ञप्तीच्या जागा व विक्री परवाने दि.27 नोंव्हेंबर रोजी   बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

Adv