प्रभागातील गणेश विसर्जनासाठी नगरसेविका गोरे यांनी केली प्रभागातच सोय

203
Adv

पालिकेच्या नगरसेविका लीना गोरे यांनी स्वखर्चातून प्रभागातील नागरिकांसाठी गणेश विसर्जनाची सोय केल्याबद्दल प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका गोरे यांचे आभार मानले

सातारा पालिकेच्या नगरसेविका लीना राजु गोरे यांनी स्वखर्चातून प्रभागातील नागरिकांसाठी गणेश विसर्जनाची सोय केली आहे कृत्रिम तळ्यावर गर्दी होऊ नये यासाठी ही उपाययोजना केल्याने प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका गोरे यांना धन्यवाद दिले अशा उपाययोजना प्रत्येक प्रभागात झाल्या असत्या तर कृत्रिम तळ्यावर गर्दी ही दिसली नसती

सातारा पालिकेने यासाठी दोन हाऊद फक्त उपलब्ध करून दिले या व्यतिरिक्त नगरसेविका गोरे यांनी कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फ्लेक्स लावून जनजागृती केली आहे स्वखर्चाने लाईट टेबल इत्यादी सजावट येथे केली असल्याचे दिसून येते या कर्तव्यदक्ष नगरसेविकेचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे दिसून येते आपल्या प्रभागातील नागरिकांची काळजी घेण्याचे काम लिना गोरे यांनी केले असल्याने प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका गोरे यांचे आभार मानले

Adv