सातारा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध विजयी ग्रामपंचायतचे उमेदवार यांनी आज निकालानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही यावेळी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या व ग्रामपंचायतीना लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले
सातारा तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींची निवडूणुक लागली होती १३० पैकी 37एवढ्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ग्रामपंचायतींची शुक्रवार अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निकाल जाहिर होताच विजयी उमेदवार, पॅनेल प्रमुख आणि कार्यकर्ते हळूहळू श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर या ठिकाणी जमा होवू लागले. निकाल जाहीर होताच गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जयजयकार केला
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी या आव्हानाला ही जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीने साथ दिली होती जिल्ह्यातील सर्व विजयी ग्रामपंचायतींना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी शुभेच्छा दिल्या असून ग्रामपंचायतींना कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी निवडून आलेल्या सदस्यांना दिले