नेमक्या अतिक्रमणांचा पालिकेने दिला तक्रारदाराला गृहपाठ

274
Adv

गोडोली येथील साईबाबा चौकात झालेल्या नेमक्या अतिक्रमणांची यादी द्या असा उलट गृहपाठ सातारा पालिकेने तक्रार दार अजय पार्टे यांना करायला लावला आहे वर्दळीच्या रस्त्यापासून वीस फूटाचा सेटबॅक असणे आवश्यक असताना साईबाबा मंदिर परिसरातील टपऱ्या अपघाताचे निमित्त ठरू शकतात नक्की कोणाची तक्रार हे संबंधितांना सांगता येत नसल्याने अतिक्रमण नक्की काढायचे कुठले असा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे

गोडोलीतील साईबाबा मंदिर चौकातील चारही रस्तावर हातगाडे, टपऱ्या,रस्त्यावर पार्किंग आणि अतिक्रमणाचा चहूबाजूंनी विळखा पडला आहे.यामुळे रोज या चौकात वाहतूक कोंडी आणि त्याचा सर्वांना नाहक त्रास होतो.या चौकातील वाहतूकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी बांधकाम विभाग पोलीस आणि नगरपालिकेकडे सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टे यांनी निवेदन दिले.अतिक्रमणाबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सामाजिक कार्यकर्ताला सर्व्हे नंबर सह अतिक्रमण दर्शवून नकाशा सादर करण्याचा गृहपाठ दिला आहे.

सातारा शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या गोडोलीतील साईबाबा चौकात चार दिशांनी येणाऱ्या रस्त्यांवर मोठी वर्दळ असते.याच चौकात चहूबाजूंनी अनाधिकृत हातगाडे,टपऱ्या, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग आहे.यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने दोन वाहतूक पोलीस आणि दोन वॉर्डन कर्मचारी असून ही तासनतास ट्रॅफिक जॅम होते.याची नगरपालिकेकडून कधीच दखल घेतली जात नाही.बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत नाहीत म्हणून सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टे आणि काही नागरिकांनी दि.५ जुलै रोजी वाहतूक कोंडीला अडथळा करणारे अनाधिकृत हातगाडे टपऱ्या रस्त्यावरील पार्किंग हटविण्याची मागणी बांधकाम विभाग, पोलीस आणि नगरपालिकेकडे निवेदन देऊन केली. मात्र याची दखल ही न घेतल्याने दि.१९ जुलै पासून या चौकात प्रबोधन फलक हातात घेऊन या चौकात गांधीगिरी मार्गाने अनेकांनी आंदोलन केले.
या गांधीगिरी आंदोलनाची चर्चा वाढल्याने तब्बल २५ दिवसांनी उपरती सुचलेल्या नगरपालिकेने सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टे यांना
नेमकी कोणती अतिक्रमणे काढणे अपेक्षित आहे. त्याची स्पष्ट माहिती त्यांच्या सर्व्हे नं. सहित द्यावी.तसेच रस्त्यावर झालेले अतिक्रमण नकाशावर दर्शवून हे पत्र मिळताच सदर बाबतीत सात दिवसांच्या आत पुरावे सादर करण्यात यावेत. तद्नंतर उचित कारवाई करणे योग्य होईल.असे पत्र मुख्याधिकाऱ्यांनी अजय पार्टे यांना दिले आहे.

Adv