संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांना भरघोस मतांनी विजयी करा खा़ उदयनराजे

128
Adv

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ भाजपा आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख, तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे भाजपापुरस्कृत अधिकृत उमेदवार जितेंद्र दत्तात्रय पवार हे दोन्हीही कार्यक्षम व उत्साही कार्यकर्ता उमेदवार आहेत. या दोघांची युवक आणि शिक्षकांप्रती असणारी तळमळ आणि त्यांची अभ्यासपूर्ण मुद्ये मांडण्याची सुयोग्य पध्दत हेरुन, यंदाच्या पुणे पदवीधर मतदार संघात, भाजपाने
त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. भारतीय जनता पार्टीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, पुणे विभागातील पदवीधर मतदार बंधु-भगिनींआणि शिक्षक मतदार बंधुभगीनींनी, अनुक्रमे संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांनाच प्रथम पसंतीचे मत देवून, प्रचंड मताधिक्याने निवडुन दयावे असे आवाहन राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

भाजपा हा भारतात सर्वदूर विस्तारलेला सध्याच्या काळातील एकमेव पक्ष आहे. भाजपा सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतुन, समाजातील सर्व स्तरातील आणि सर्व घटकांसाठी अहोरात्र झटत आहे. सध्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोघांनी मिळुन एखादा अपवाद वगळता, पुणे पदवीधर मतदार संघ भाजपाकडे राखलेला आहे. यंदाच्या वेळी पुणे पदवीधर
मधुन संग्राम देशमुख यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. पुणे विभागातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार असलेले जितेंद्र पवार यांचे शिक्षण
क्षेत्रात अनमोल योगदान आहे. त्यांच्या ज्ञानाचा लाभ सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहका-यांना व्हावा म्हणून
भाजपाने त्यांना पुरस्कृत केले आहे. पुणे पदवीधर मतदार संघातुन संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदार संघातील जितेंद्र पवार या दोघांना आम्हीच उमेदवार आहोत असे समजुन, पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी आपल्या पहिल्या पसंतीचे मत दयावे असे आवाहन आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद
केले आहे.

Adv