विविध सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करु नये – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

295
Adv

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांबरोबर बँकेच्या तसेच पतसंस्थांच्या व्यवहारावरही  परिणाम झाला आहे.  सहकारी बँकांनी तसेच पतसंस्थानी, विविध सहकारी संस्थांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करु नये त्यांना किमान वेतन द्यावे, असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांबरोबर बँकेच्या तसेच पतसंस्थांच्या व्यवहारावरही  परिणाम झाला आहे. तरी राज्यातील सहकारी बँका पतसंस्था यानी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करु नये त्यांना किमान वेतन द्यावे. तसेच राज्यातील विविध माकेट कमिटया सुरु आहेत या मार्केट कमिट्यांमधील अधिकारी व कामगारांचे वेतन कपात करु नये, असे आवाहनही सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

Adv