आरोग्य निरिक्षकांचे हायप्रोफाइल राजकीय लागेबांधे कारवाईसाठी अडचणीचे ठरत आहेत .आरोग्य विभागातील हा मस्तवालपणा मोडून काढण्याची खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीतील हिंमत एकही पदाधिकारी दाखवत नसल्याने गुडगुडी बाबाने सर्वांना लक्ष्मी दर्शन घडवल्याची चर्चा सुरू झाली आहे
सरकारी व्यवस्थेतला गुडगुडी बाबा हा आरोग्यपूर्ण अधिकारी आहे . आता कळीच्या या नारदावर कारवाई करायची म्हणजे आरोग्य विभागाची टक्केवारीची व्यवस्था कोणी सांभाळायची हा खरा अडचणीचा विषयं आहे . . लक्ष्मी दर्शनातून गुडगुडी बाबाने आपल्या राजकीय संबंधाच्या प्रभावातून व्यवस्था च खिशात घातल्याने पदाधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे .आरोग्य विभागाचा एक प्रमुख गुडगुडी बाबाला नोटीस बजावतो मात्र ती नोटीस मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावरच पडून राहते तेव्हा टक्केवारीचा कीडा पालिकेच्या यंत्रणेला किती खोलवर चावलाय याचे विदारक दर्शन होते .
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या पालिकेतील सत्तेत महाराजांचेच नाव घेऊन काही बांडगुळ संस्थाने फोफावल्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत . लोकांसाठी समाजकारण करणाऱ्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या तत्वांना हरताळं फासण्याचे काम सुरू आहे .आरोग्य निरिक्षकाच्या राजकीय टगेगिरी पुढे पदाधिकाऱ्यांनी लोटांगण का घालावे ? त्यामुळे या प्रकरणात बरेच पाणी मुरल्याची चर्चा आहे .आरोग्य निरिक्षकांच्या दहा दिवसाच्या सुट्टीचा आणि त्यांच्या दुबई दौऱ्याचा हा मूळ मामला . मात्र करोनाच्या संक्रमणाचा धोका वाढल्यानंतर जो बेशिस्तपणा गुडगुडी बाबांनी दाखवला तो निर्लज्जपणाचा कळस होता .स्वतःच्या क्वारंटाईनचे निय स्वतःच मनमानीपणे मोडले .आरोग्य प्रमुखांशी हुज्जत घालत त्याची कर्मकथा राजकीय मंत्र्यांच्या कानापर्यंत पोहचवण्याची दक्षता गुडगुडी बाबांनी घेतली .पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी गेल्या साडेतीन वर्षात कधीही कठोर कारवाईचा पवित्रा घेतला नाही .
कारण बिनबोभाट खिशात येणारी लक्ष्मी आणि राजकीय सोकावलेपणा हा इथल्या सडक्या व्यवस्थेचा भाग काही अधिकाऱ्यांनी करून ठेवला आहे . आणि त्यातूनच सातारकरांच्या श्रमाचे पैसे बिनबोभाट ओरबाडायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे . मग प्रत्यक्ष कामावर नसणाऱ्या सफाई कामगारांची कागदोपत्री हजेरी दाखवून तब्बल सतरा लाख रुपयांची बिले कशी निघतात याची साद्यंत कुंडली सातारानामाकडे उपलब्ध आहे . अर्धवट बुध्दीच्या कुडमुडयांनी चौकटीत रहावे जर त्यांच्या खाऊगिरीची पोटली उघडली तर ते साताऱ्यात थांबू शकणार नाहीत .
चौकट
सातारा पालिकेच्या घंटागाडी चालकावर जर गुन्हा दाखल होऊ शकतो तर गुडगुडी बाबांवर का नाही ? हा सातारकरांचा सवाल आहे . क्वारंटाईन कालावधीत पालिकेत येऊन तेथील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अर्धवट गुडगुडी बाबांवर फौजदारी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी द्यावेत . मात्र खालच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मी दर्शनाचा लाभ घेतला काय ? याचीही सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे .