Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Uncategorized पॅचिंग चे ठेकेदार झाले रस्त्याचे मालक ट्राॅफिक विभाग कारवाई करणार का

पॅचिंग चे ठेकेदार झाले रस्त्याचे मालक ट्राॅफिक विभाग कारवाई करणार का

168
Adv

गोल बाग ते गुरांचा दवाखाना रस्त्यावरील पॅचिंग चे काम सुरू होते हे काम करताना ठेकेदाराने दोन्ही बाजूकडील रस्ताच चारचाकी गाड्या अडवून बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले कुठल्या आधारे यांनी हा रस्ता बंद केला यावर पोलिस काय कारवाई करणार का हा प्रश्न सातारकर नागरिक विचारू लागले आहेत संबंधित चार चाकी वाहनांचे नंबर घेऊन पोलिसांनी कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक करत आहेत

संबंधित ठेकेदाराकडे स्वताची यंत्रणा नसेल तर कोणत्या आधारे त्याला काम दिले तिथे कुठला फलक दिसला नाही बॅरिकेट्स नव्हते मग कोणत्या आधारे काम दिले गेले सदरचा रस्ता बंद केल्याने नागरिकांची संबंधित कामगारांना बरोबर वादावादी झाल्याचेही चित्र दिसून आले कामगार एवढे निर्भिड होते की आम्हाला संबंधित ठेकेदाराने रस्ता बंद करूनच काम करावे लागेल अशी सूचना दिली आहेत आशया अभिर भावात उत्तरे देत होती

सदरचा रस्ता हा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवरांच्या घराकडे जाणार आहे रस्ता असून रस्त्याचे पॅचिंग नक्की किती दिवस टिकणार याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत संबंधित ट्रॅफिक पोलीस अधिकारी या ठेकेदारावर कारवाई करणार का कोणाच्या दबावाखाली गप्प बसणार हा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे

सर्वसामान्य नागरिकाने गाडी चुकीच्या ठिकाणी लावली तर ट्राफिक पोलीस गाडी उचलुन घेऊन जातात इथे तर चक्क फोरविलर रस्त्यावर आडवया लावल्याने ट्राफिक पोलीस गप्प का नक्की कारण काय हे कोडे सातारकरांना उलगडले नाही ठेकेदारच मालक झाल्यासारखे वागत असल्याने आमचे कोणी काही करू शकत नाही असे दिसते उद्या सर्वसामान्यांनी जर रस्ता अडवला तर त्याच्यावर कारवाई करतात मात्र ठेकेदारावर कोणी कारवाई करत नसल्याचे दिसून येते

Adv