जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जैवविविधता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती लवकर स्थापन करायची असल्याने या समितीमध्ये आपले स्थान निश्चित व्हावे यासाठी भाजपतर्फे प्रत्येकाचे प्रयत्न चालू असून भाजपचा एकही नगरसेवक नगरसेविका घटनेने पक्षप्रतोद गटनेता नियुक्त केले नसून भा जपाच्या नगरसेविका मात्र स्वतःला भाजपच्या गटनेता पक्षप्रतोद असल्याचे पत्र पालिकेला दिली असल्याची गंभीर घटना समोर आली आहे
भाजपच्या काही व्यक्तीशी संपर्क साधला असता सातारा पालिकेत सहा नगरसेवकांपैकी एकालाही अधिकृतरीत्या गटनेता पक्ष प्रतोत जाहीर हे केले नसून भाजपच्या नगरसेविका कशाच्या आधारे गटनेता पक्षप्रतोद हे पद मिरवत आहेत हा खरा प्रश्न आहे
नगरसेविका जर अशा प्रकारे स्वतःच्या पत्रावर खोटी पदे लिहीत असतील तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा त्यांना निवडून आपण चूक तर केली नाही ना असा प्रश्न नागरिक विचारत आहेत दरम्यान या घटनेवर भाजपा संबंधित नगरसेविका वर काय कारवाई करणार हा खरा प्रश्न आहे