कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील गोरगरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची तातडीने मदत द्या; युवाशक्ती फौंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेल द्वारे निवेदन

31
Adv

कोरोन व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण आपल्या महाराष्ट्रात आढळल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्ह्यात देखील २ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोरगरीब नागरिक कोरोनच्या भीतीने आपल्या रोजंदारीवर जाण्यास टाळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंची तातडीने मदत द्यावी अशी मागणी युवाशक्ती फौंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-मेल द्वारे निवेदन देऊन केली आहे.

संग्राम बर्गे यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, कोरोना व्हायरसमुळे समाजातील प्रत्येक घटकाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतामध्ये देखील या कोरोन व्हायरसने शिरकाव केला असून, १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात कोरोन व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना करत असताना दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यास ज्या नागरिकांची परिस्थिती हलाकीची आहे. तसेच ज्यांचे हातावरचे पोट आहे. दिवसा काम केल्याशिवाय ज्यांची चूल पेटत नाही अशा लोकांवर या कोरोन व्हायरसमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारांचा रोजंदारीचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. संपूर्ण जगात कोरोन व्हायरसवर उपाययोजना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र यासाठीचा निश्चित कालावधी सांगता येणार नाही. त्यामुळे जे नागरिक व कुटुंबे निराधाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील गोरगरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची तातडीने मदत द्या; युवाशक्ती फौंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेल द्वारे निवेदन

सातारा : कोरोन व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण आपल्या महाराष्ट्रात आढळल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्ह्यात देखील २ संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोरगरीब नागरिक कोरोनच्या भीतीने आपल्या रोजंदारीवर जाण्यास टाळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंची तातडीने मदत द्यावी अशी मागणी युवाशक्ती फौंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-मेल द्वारे निवेदन देऊन केली आहे.

संग्राम बर्गे यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, कोरोना व्हायरसमुळे समाजातील प्रत्येक घटकाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतामध्ये देखील या कोरोन व्हायरसने शिरकाव केला असून, १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात कोरोन व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना करत असताना दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यास ज्या नागरिकांची परिस्थिती हलाकीची आहे. तसेच ज्यांचे हातावरचे पोट आहे. दिवसा काम केल्याशिवाय ज्यांची चूल पेटत नाही अशा लोकांवर या कोरोन व्हायरसमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. उद्योगधंदे बंद असल्याने रोजगारांचा रोजंदारीचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. संपूर्ण जगात कोरोन व्हायरसवर उपाययोजना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र यासाठीचा निश्चित कालावधी सांगता येणार नाही. त्यामुळे जे नागरिक व कुटुंबे निराधार, दारिद्र्यरेषेखाली आहेत त्या नागरिकांचा व कुटुंबांचा विचार करण्याची आज गरज आहे. ज्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कोरोन व्हायरस थांबिविण्यासाठी आपण करीत आहात त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या बांधवाना, माता-भगिनींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून किमान २ महिने पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध करून द्यावा. भविष्यात परिस्थिती हाताबाहेर गेल्यास या सर्व नागरिकांना आपण किमान २ महिने पुरेल इतका धान्यसाठा दिल्यास तोच त्यांना जगण्याचा खरा आधार ठरेल. त्यामुळे आपण दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना जीवनाषक वस्तूंची तातडीने मदत करावी. अशी मागणी युवाशक्ती फौंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-मेल द्वारे निवेदन देऊन केली आहे.

Adv