राष्ट्रवादी पक्षाचे वाई खंडाळा विधानसभेचे आमदार मकरंद पाटील यांची कॅबिनेट पदी वर्णी जवळ जवळ निश्चित झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतरच नाव जाहीर होणार आहे
वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातून मकरंद पाटील यांनी आपल्या आमदारकीचा चौकार मारला असून येणाऱ्या मंत्रिमंडळात आमदार मकरंद पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड जवळजवळ निश्चित झाली असून फक्त अधिकृत घोषणा होणेच बाकी असल्याचे मुंबईतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले
दीड वर्षांपूर्वी आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची संधी असताना मतदार संघातील जनतेला विसरून निर्णय घेतो अशी भूमिका घेऊन मंत्रीपद नाकारले होते मात्र आता त्यांच्या गळ्यात सहकार मंत्री पदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे
मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन अजित पवार गटाचा झेंडा आमदार मकरंद पाटील यांनी फडकवला असल्याने त्यांना राष्ट्रवादीच्या गोटातून कॅबिनेट मंत्रीपद मिळणार हे निश्चित झाले आहे