शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा.

108
Adv

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब हे राज्यभर शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना सर्वतोपरी ताकत देऊन शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.परंतु वाई विधानसभा प्रमुख असलेले विकास शिंदे हे पक्षाकडून आलेला निधी वरिष्ठांना भूलथापा देऊन स्वतःच मनमानी करून वापरत तालुका पदाधिकाऱ्यांना अक्षरशः फाट्यावर मारत आहेत तसेच मी माझ्या स्कीलवर निधी आणतोय तालुक्यात तुमच्याबरोबर किती कार्यकर्ते आहेत तुमच्यात दम असेल तर तुम्ही आणा वरून निधी माझ्या नादाला लागू नका नायतर बघा मग अशी वल्गना करून बैठकीत कालवा,गोंधळ करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनाच दमदाटी? करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केला असून विकास शिंदे यांच्या बाजारू राजकारणाला कंटाळून वाई तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या १८पदाधिकाऱ्यांनी शनिवार दिनांक१३रोजी शिवसेना सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांचेकडे एकाच वेळी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर येत आहे
शिवसेना शिंदे गटाच्या वाई तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सामूहिक राजीनामा पत्रात म्हटले आहे की आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठांनी विकास शिंदे यांच्या भूलथापांना बळी पडून विकास कामांसाठी लागणारा निधी हा शिंदे यांच्याकडेच सोपविला असल्याने निष्ठावान शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी तसेच उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दि.१२सप्टेंबर २०२५ रोजी वाई येथील शासकीय विश्राम ग्रहावर झालेल्या बैठकीत जाहीर नाराजी व्यक्त केली होती .दरम्यान एकनिष्ठ सक्रिय पदाधिकाऱ्यांना ताकत न देता इतर पक्षातील काही घटकांना निधी वाटप करून विकास शिंदे हे नेमका कुणाचा पक्ष वाढवत आहेत.
सेनेच्या मुख्य पदाधिकारी व निष्ठावान शिवसैनिकांना विकास कामासाठी निधी वाटप करताना डावलले जात असल्याने तालुक्याचे पद असूनही पदाला योग्य न्याय देऊ न शकल्याने भविष्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते असे निवेदनात म्हटले आहे
तसेच विकास शिंदे हे पक्षाच्या नावाखाली वारंवार स्वार्थी व बाजारू राजकारण करत आहेत असा आरोप निवेदनात केला आहे. निवडणुका लागल्या की उमेदवार उभा करणे आणि विरोधी उमेदवारांच्या गाठी भेटी घेऊन तडजोडी करून मलिदा लाटणे व स्वतः ज्या पक्षात काम करत आहेत त्यांनी दिलेल्या उमेदवाराचा अक्षरशः बाजार करणे हा विकास शिंदे यांनी निवडणूक काळातील पारंपरिक व्यवसाय बनविला असल्याने त्यांना उमेदवार निवडून आला काय आणि पराभूत झाला काय याच्याशी काहीच देणेघेणे नसते. असेही निवेदनात म्हटले आहे.
आजपर्यंत विकास शिंदे यांचे दिखाऊ कार्यकर्ते सोडले तर पक्षवाढीसाठी कसलेही ठोस प्रयत्न केलेले नाहीत.फक्त स्वतःचा भरघोस विकास
एवढेच काय ते धोरण गेल्या अडीच वर्षात अवलंबलेले दिसते.खोटं बोल पण रेटून बोल हा फॉर्म्युला वापरत
पक्षाकडून आलेला निधी वारंवार एकट्याकडेच ओढून घेत आहेत. विकास कामांच्या निधीबाबत विचारणा केल्यास पदाधिकाऱ्यांना दमदाटी करणे,धमकावणे असे प्रकार केले जात आहेत याबाबत वरिष्ठांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही तसेच निधी वाटप करताना तालुका पदाधिकारी यांनी दिलेली विकास कामांची यादी यांचा विचार करून समन्वय साधला जात नसल्याने विकास शिंदे त्याचा फायदा घेत पदाधिकाऱ्यांना एकटे पाडण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असल्याने सर्व पदाधिकारी राजीनामा देत असून एकनिष्ठ शिवसैनिक म्हणुन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत राहू असे निवेदनात म्हटले आहे.

*चौकट….१…राजीनामा देणारे पदाधिकारी…*
श्री गणेश दत्तात्रय सावंत शिवसेना वाई उप तालुकाप्रमुख, प्रताप बाजीराव भिलारे शिवसेना वाई विभाग प्रमुख,किशोर जनार्दन भगत शिवसेना वाई शहर प्रमुख,अच्युत शंकर भिलारे लोहारे शिवसेना शाखाप्रमुख,मंगेश आनंदराव भिलारे शिवसेना लोहारे उपशाखाप्रमुख,संदीप प्रकाश जाधव शिवसेना यशवंतनगर शाखाप्रमुख,सुधन बळीराम भंडारी शिवसेना यशवंतनगर शाखाप्रमुख,अमर अरुण सूर्यवंशी शिवसेना यशवंतनगर शाखाप्रमुख,
विनायक विजू धिरडीकर
शिवसेना यशवंतनगर शाखाप्रमुख,महावीर वायफळकर शिवसेना यशवंत नगर शाखाप्रमुख,
सुरज ढेरे शिवसेना यशवंतनगर उपशाखाप्रमुख,
सोमनाथ मनोरंजन गायकवाड शाखाप्रमुख कळंबे,शिवाजी मानसिंग भिलारे बूथ प्रमुख लोहारे,अंकुश रघुनाथ पोळ
शिवदूत लोहारे,पुरुषोत्तम कालिदास सावंत गटप्रमुख लोहारे,मंगेश आनंदराव भिलारे उपशाखा प्रमुख लोहारे.

Adv