निकृष्ठ काम करणा-या ठेकेदाराला क्लीन चीट?.

39
Adv

सादिक सय्यद
👇🏻
पाचगणी नगरपालीकेचे नुतन मुख्याअधिकारी पंडीत पाटील यांनी पांचगणीच्या सिडणे पॅाईट येथे माझी वसुधरा अभियानाअतर्गत उभारण्यात आलेले . सोलर टॅी अवकाळी पाऊसात पडल्यानतंर . पाचगणी नगरपालीकेच्या निकृष्ठ कारभाराचा पंचनामा झाला होता . याबाबत संबधित ठेरेदाराला काळ्या यादीत टाकुन अनामत रक्कम जप्त करावी अशी मागणी करण्यात आली होती . मात्र पाचगणीचे नुतन मुख्याअधिकारी पंडीत पाटील संबधित कामाच्या कार्यादेशामध्ये देखभाल दुरुस्ती कालावधी शिल्लक असल्याचे कारण दाखवत . संबधित ठेकेदाराला पुन्हा काम करवुन घेण्याचे आदेश देत . पाचगणी शहरातील विकास कामात निकृष्ठ काम करणा-या राजकीय वरदहस्त ठेकेदाराला पाठीशी धालण्याची चर्चा आहे .
सिडणे पॅाईट येथील सोलर ट्रीचे काम करणा-या ठेकेदाराने मंत्र्याच्या घराचे काम केले असल्यामुळे राजकीय दबावापोटी पंडीत पाटील यांनी ठेकेदारावर कारवाई केली नसल्याची चर्चा पाचगणी शहरात आहेत .

पाचगणी शहरात विकास कामांना आलेला निधी गुणवत्तापुर्वक कार करण्यातरीता वापर होतो का ? हा संशोधनाचा विषय आहे . कामाची गुणवत्ता निसर्गाच कारण दाखवत पळवाटा नेहमी अधिकारी काढतात . तर ठेकेदार हाच कार्यकर्ता म्हणुन राजकीय दबाव पाचगणी शहरातील विकास कामात नेहमी पाहयला मिळत आहे . पाचगणीचा कृतीशील शाश्वत विकास गुणवत्तापुर्वक कधी होणार हा अधोरेखीत प्रश्न सर्वसामान्य जनतेकडुन विचारणा होत आहे .

Adv