
भुईंज, ता .वाई. येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना या 2021-22 च्या गळीत हंगाम अजूनही चालू केला नाही. या कारखान्याचे सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सभासद वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. किसनवीर कारखान्याने चालविण्यास घेतलेला खंडाळा सहकारी कारखाना आणि प्रतापगड साखर कारखान्याचेही गाळप बंद आल्याने वाई, खंडाळा, जावली, सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कारखाना चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी कारखाना चालू न केल्यास यावर राज्य सरकारने प्रशासक नेमून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी रयत क्रांती संघटना सातारा जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश सोनू साबळे यांनी केली आहे
चौकट-सहकारमंत्री च्या जिल्ह्यात शेकऱ्याच्यावर अन्याय होत असताना 5 तालुक्यातील शेतकरी देश धडीला लागत असताना गप्प का??







