येत्या सोमवारी जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाची निवड असून बारामतीच्या लखोटयात चेअरमन पदासाठी कोणाचे नाव देते याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी बिनविरोध संचालक झालेले आ मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील काका यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जात आहे
सहा डिसेंबरला चेअरमन निवड होणार आहे राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले कुटुंब म्हणून स्वर्गीय माजी खा लक्ष्मणराव पाटील तात्या यांच्या कुटुंबाकडे पाहिले जाते यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्यां पैकी आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील काका यांचाही समावेश झाला होता राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जिल्हा बॅंकेच्या चेअरमन पदाचा निर्णय घेणार असून चेअरमन पदासाठी जवळजवळ नितीन पाटील काका यांची निवड निश्चित मानली जात असल्याचे बोलले जाते
नितीन काका बऱ्याच वर्षापासून जिल्हा बँकेचे संचालक असल्याने त्यांना बँकेच्या कामकाजाचा अनुभव दांडगा असून याचा उपयोग या चेअरमन पदासाठी होणार आहे तर दुसरीकडे व्हाईस चेअरमन पदी शिवरूपराजे खर्डेकर किंवा कांचन साळुंखे यांची निवड होण्याची दाट शक्यता ही असल्याचे बोलले जाते