वर्गणी जमा करावयाची असल्यास सहाय्यक धार्मादायची आयुक्त यांची परवानगी घेणे बंधनकारक

41
Adv

सातारा दि.29 : सातारा जिल्ह्यातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व देणगीदार यांनी धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) नुसार सहाय्यक धार्मादाय आयुक्त, सातारा यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी शिवाय सार्वजनिक उपक्रमास निधी जमा करणे हा फौजदारीर स्वरुपाचा गुन्हा आहे. असे आढळल्यास वरील कायाद्याचे कलम 66 व 67 नुसार फौजदारी करवाई करण्याची तरतुद आहे, असे सहाय्यक आयुक्त धर्मादाय आयुक्त, सातारा यांनी कळविले आहे.
सन 2025 सालातील तात्पुरत्या स्वरुपातील परवानगी देण्याचे काम दि. 26 ऑगस्ट 2025 अखेर चालू राहणार आहे.
देणगी दारांनी देणगी देण्यापूर्वी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडील परवानगी प्रत पाहून खात्री करून देणगी, वर्गणी बाबत निर्णय घ्यावा. तसेच सर्व गणेश उत्सव मंडळाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी देणगी, वर्गणी स्वीकारण्यापूर्वी परवाना दाखविणेची व देणगी/वर्गणी मिळाले बाबतची आवश्यक ती पावती देण्याची खबरदारी घ्यावी, असेही सहाय्यक धर्मादाय आयुक्त सातारा विभाग सातारा यांनी कळविले आहे.

Adv