शिवापुर टोल नाका हटाव कृती समितीच्या व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्या पुढे प्रशासन निरुत्तर.

124
Adv

शिवापुर टोल नाका हटाव कृती समितीच्या व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्या पुढे प्रशासन निरुत्तर..!!! शिवापूर टोलनाका हटवण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे जिल्हाधिकार्यांचे आश्वासन..!!! शिवापुर टोल नाका हटाव कृती समितीची बैठक आज मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

भोर वेल्हा मुळशीचे सन्माननीय आमदार संग्रामदादा थोपटे, खडकवासला मतदार संघाचे सन्माननीय आमदार भिमराव (आण्णा) तापकीर व समितीच्या आक्रमक पवित्र्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकारयांची अक्षरशः भंबेरी उडाली. टोल चे गाढे अभ्यासक संजय शिरोडकर यांनी शिवापुर टोलनाक्याच्या बेकायदा वसुली व तांत्रिक चुकांवर जाब विचारला. समितीच्या कोणत्याही प्रश्नावर प्रशासनाला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. आमदार संग्रामदादा थोपटे यांनी हा टोलनाका भोर फाटयाच्या पुढे तात्काळ हटवा अशी आग्रही भुमिका घेत सन २०११ च्या सर्वपक्षीय आंदोलना नंतर टोलनाका हटवण्याची प्रशासनाने केलेली अर्धवट कारवाई पुर्ण करावी अशी भुमिका मांडली.

तर आमदार भिमराव (आण्णा) तापकीर यांनी देखील हीच भुमिका घेत जर रस्त्याची कामे वेळेवर पुर्ण होत नसतील तर टोल वसुली तात्काळ बंद करा असे अधिकारयांना सुनावले.

Adv