शाहूनगर येथील एस.टी.कॉलनी-गुरुकृपा कॉलनी ते अजिंक्य बझार चौक हा रस्ता खूप रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून याची तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी अँड सचिन तिरोडकर यांनी नगराध्यक्ष माधवी कदम व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
सातारा नगरपरिषद सातारा ची हद्दवाढ होवून शाहूनगर हा त्रिशंकु भाग नगरपरिषद हद्दीमध्ये समाविष्ट झालेला आहे. शाहूनगर येथील एस.टी.कॉलनी-गुरुकृपा कॉलनी ते अजिंक्य बझार चौक हा रस्ता खूप रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. यामुळे वाहन चालकांना व पादचारी यांना फार मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून साईडपट्टी खचलेली
असत्यामुळे अपघात होवून वाहन चालक व नागरीकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक व गरजेचे आहे.
सदर रस्त्याची दुरुस्तीसाठी मा.नगराध्यक्षा यांच्या अधिकारातील राखीव फंडच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देवून सदर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी व शाहूनगर वासीयांना दिलासा द्यावा अशी विनंती ही सचिन तिरोडकर यांनी यावेळी केली आहे