शेतीपूरक योजनांना केंद्र सरकारने पाठबळ द्यावे

247
Adv

आपला देश कृषीप्रधान देश आहे. देशाच्या विकासामध्ये कृषी क्षेत्राचे अनन्यसाधारण योगदान आहे. ग्रामिण भागातच ख-या अर्थाने भारतीयत्व सामावलेले आहे . त्यामुळेच ग्रामिण विकासाच्या पायाभुत सुविधा अधिक भक्कम करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रामध्ये सामुहिक शेती, सेद्रीय शेती , शेतीपूरक व्यवसाय याकरीता सातारा जिल्हयातील विविध योजनांना केंद्राने भरभक्कम पाठबळ दयावे अशी विनंती आज केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री ना. शिवराज सिंह चौहान यांचेकडे केली.
ना. शिवराजसिंह चौहान यांची नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेताना, सातारा जिल्हयातील ग्रामीण भागातील घरकुल उदिष्टे व सातारा लोकसभा मतदार संघातील गावांच्या शाश्वत विकासाबाबतीत झालेल्या चर्चेत नमुद केले की,
सातारा जिल्ह्यामध्ये आले, हळद, बटाटा, स्ट्रॉबेरी, सोयाबीन, घेवडा व इतर पिकांच्या मोठी लागवड होत असते. याबाबतीत संशोधन केंद्रे निर्माण केल्यास, विविधांगी संशोधनातुन या पिकांच्या शास्त्रीय लागवडीसह उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे. शेतक-याची आर्थिक उन्नती होणार आहे. तसेच सातारा जिल्हयातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील बळीराजाला पारंपारिक आणि आधुनिक तांत्रिकतेच्या दृष्टीने मार्गदर्शन होण्यासाठी सातारा जिल्ह्यात केंद्र शासनाच्या माध्यमातुन कृषी विज्ञान केंद्रे स्थापन होणे गरजेचे असल्याने असे केंद्र स्थापन करावे अशी देखिल विंनती यावेळी केली.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील गावपातळीवर पात्रता धारकांना हक्काची घरे मिळवून देणेसाठी आम्ही विशेष आग्रही आहोत. प्रत्येक कुटुंबाला हक्काचा निवारा मिळाला पाहीजे अशी आमची प्रामाणिक धारणा आहे. म्हणूनच ग्रामीण भागातील ग्रामस्थासाठी प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांचे सातारा जिल्ह्याचे असलेले उदिष्टे अधिक वाढवून मिळावे . जेणेकरुन, कोणीही पात्र ग्रामस्थ हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही अशी कार्यवाही व्हावी
केंद्र शासनाच्या योजनातुन जिल्ह्याला लाभ मिळवून स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्याचा पाठपुरावा देखिल आवश्यकतेप्रमाणे राज्याकडे आणि केंद्राकडे आम्ही करीत आहोत. केंद्राशी संबंधीत कृषी व ग्रामिण विकासाच्या सातारच्या योजनांचा आपण स्वत: लक्ष घालून प्राधान्याने विचार करावा अशी सदिच्छा देखिल याप्रसंगी ना.शिवराजसिंह चौहान यांचेकडे व्यक्त केली.
ज्या तळमळीने कृषी आणि ग्रामिण विकास योजनांबाबत जे प्रश्न आणि मते व्यक्त केली, त्याबाबत आम्ही निश्चितच सहमत आहोत, सातारा जिल्हयाकरीता कृषी आणि ग्रामिण विकासाच्या जास्तीत जास्त योजना राबविणेकरीता योग्य पावले अधिक जलदगतीने उचलली जातील असेही ना.शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रसंगी काका धुमाळ, ॲड.विनित पाटील, दिल्ली येथील स्वीयसहाय्यक करण यादव उपस्थित होते.

Adv