लोकसभा दौऱ्याच्या अनुषंगाने आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सकाळपासून कराड उत्तर, कोरेगाव, वाई विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला यावेळी महायुतीतील नेत्यांसह विविध मान्यवर व सर्वसामान्य नागरिक यांच्याशी चर्चा केली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री छ उदयनराजे भोसले यांनी आज काही जिल्ह्यातील माहितीच्या काही विविध मान्यवरांची भेट घेतली बावधन या गावी खा श्री छ उदयनराजे भोसले यांचे गळाभेट घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पिसाळ यांनी स्वागत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत वाई मतदार संघातील काही मान्यवर व्यक्तींनी सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाला मिळावा यासाठी प्रयत्न केले मात्र वाई तालुक्यातच खा श्री छ उदयनराजे भोसले जोरदार स्वागत झाल्याने जिल्ह्यातील मान्यवरांच्या भुवया उंचावल्या आहेत
छ उदयनराजे भोसले यांच्याबरोबर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्यावर मध्ये मनोज दादा घोरपडे धैर्यशील कदम चित्रलेखा माने कदम अशोक बापू गायकवाड भीमराव काका पाटील आदि मान्यवर बरोबर होते कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्याबरोबर ही लोकसभेच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा झाली असल्याचे समजते