सेवागिरी कृषी – पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्या उद्घाटन

171
Adv

श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी यात्रेनिमित्त राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन दि. २१ ते २६ या कालावधीत संपन्न होत आहे. दि. २२ रोजी सकाळी १० वा. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांनी दिली.

खा. छ उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. संजयकाका पाटील, आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, आ. राहुल कुल, आ. बाळासाहेब पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी याकरिता कृषी प्रदर्शनात शेतमालास बाजारपेठ, अन्नप्रक्रिया, खते आणि पाणी व्यवस्थापन, बदलते हवामान, कृषी विषयक अवजारे, अत्याधुनिक फवारणी यंत्रे यासह नामवंत कंपन्यांच्या २५० स्टॉलचा सहभाग असणार आहे.

Adv