सातारा विकास आघाडी च्या कारकिर्दीत बावीस सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान

59
Adv

सातारा पालिकेत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार बावीस सफाई कामगारांना वारसा हक्काप्रमाणे नियुक्ती पत्रे देण्यात आली . या नियुक्ती संदर्भात पालिका कामगार युनियनने पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत .

येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, कामगार युनियनचे अध्यक्ष व मार्गदर्शक अॅड धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी दोन वाजता झालेल्या आटोपशीर कार्यक्रमात लाड पागे समितीच्या शिफारशी प्रमाणे चतुर्थ श्रेणी कामगारांच्या वारसा हक्काप्रमाणे प्रतीक्षा यादीवरील बावीस कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष माधवी कदम व अॅड धैर्यशील पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली . आस्थापना विभाग प्रमुख अरविंद दामले यांनी नियुक्त कामगारांची यादी वाचून दाखविली .

सातारा पालिका कामगार संघटनेत दोन गट असल्याने नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची अडचणं झाली होती . मात्र हा प्रश्न समन्वयाने सोडवण्यात आला व बावीस कर्मचाऱ्यांच्या आवश्यक कागदपत्रांची छाननी पूर्ण करण्यात येऊन गुरूवारी संबधितांना आरोग्य विभागात रूजू करून घेण्यात आले . सफाई कामगार हा प्रशासनाचा हा महत्वाचा घटक आहे . त्यांचे हक्क त्यांना मिळालेच पाहिजेत . आणि कामगारांनी सुद्धा नेमून दिलेली जवाबदारी चोखपणे पार पाडावी अशी अपेक्षा अॅड धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केली नगराध्यक्ष माधवी कदम यांनी सर्व नियुक्त सफाई कामगारांना शुभेच्छा दिल्या . यावेळी आरोग्य सभापती अनिता घोरपडे, पाणी पुरवठा सभापती यशोधनं नारकर, पक्षप्रतोद निशांत पाटील , अॅड दत्ता बनकर, नगरसेविका सविता फाळके, यावेळी उपस्थित होते .

Adv