सातारा -फलटण रस्त्यालगत असलेल्या वाढे गावाच्या हद्दीतील देविका कार्यालय सुरू झाल्यापासून पार्किंग प्रश्न निर्माण झाला आहे. मालकाने नावाला केलेल्या पार्किंगची सोय असली तरी तिथे वाहने उभी न करता रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. सोमवार दि.२६ जुन रिम जिम पावसात सायंकाळी ४:३०:ते ७:३० एवढा काळ वाहतूक कोंडी झालीहोती.यावेळी सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस … यांच्या सह तब्बल ७ ते ८ पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठीप्रयत्न करत होते.यावेळी दोन्ही बाजूने बेशिस्त वाहन चालकांची घाई गडबड वाहतूक अधिक कोंडी करत होते.यावेळी परिसरातील अनेक वाहनधारकांनी देविका कार्यालयाच्या मालकाला लाखोली वाहत आपल्या संताप व्यक्त करत होते.जेव्हा या कार्यालयात कार्यक्रम होतात, तेव्हा वाहतूक कोंडी होते.याबाबत वाढे ग्रामपंचायतीने मालकाला नोटीस, समज देऊन हीसुधारणा होत नाही.सोमवार दि.२६ जुन रोजी विवाह सोहळा या ठिकाणी असल्याने दुपार पासून रात्री ७:३० पर्यंतवाहतूक कोंडी झाली होती. रिमजिम पाऊस पडत असताना झालेली ही ३ तासांपेक्षा अधिक काळ कोंडी सातारा लोणंद रोड वरअसलेल्या देविका कार्यालयाचा पार्किंग प्रश्न मालकाकडून सोडवला जात नसेल तर कार्यालयास टाळा लाऊमदन साबळे,सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ अध्यक्ष लोकराजा महेशजी शिंदे साहेब मित्र मंडळ, वडूथ सातारा
प्रतिक्रीया
लोकनियुक्त कोरेगावचे भाग्यविधाते आमदार महेश दादा शिंदे यांनी या सातारा लोणंद रस्त्यावर असलेल्या देविका हॉल संदर्भात खंत व्यक्ती केली अशा गोष्टी जर माझ्या मतदार संघात घडत असतील तर त्याला आपण शंभर टक्के च आवर घालू कारण नागरीकांना नाहक त्रास होत आहे दोन दोन तास या ठिकाणी रांगा लागत आहेत त्यामुळे सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे अशा गोष्टी थांबवण्यासाठी नक्कीच सदैव कटिबद्ध राहू लोकनियुक्त आमदार महेश दादा शिंदे कोरेगाव विधानसभा







