सातारा जावळी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री छः शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सामजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायत परळीच्या सदस्या सौ रोशनी सुमित काठाळे यांचेकडुन ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळा परळी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही पेन व खाऊ वाटप करणेत आले. तसेच यापुढील काळात ही महाराज साहेबांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणार असेलच सौ. रोशनी ताई काठाळे यांनी नमूद केले
ग्रामपंचायत सदस्य सौ रोशनी काठाळे या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात विविध माध्यमांच्या स्वरूपात त्यांनी गोरगरिबांची आजपर्यंत सेवाच केली असून तोच वारसा इथून पुढे सुरू ठेवणार असल्याचेही सौ काठाळे यांनी सांगितले या वेळी सुमित काठाळे रोहीत पानसरे श्रीनिवास वांगडे वैभव पानसरे लखन गुजर अक्षय पाटील प्रफुल्ल जाधव विशाल देशमुख लांभाते सर सोनवणे मॅडम शैलेश अड़ागळे रोहीत काठाळे विपुल पानसरे अक्षय काठाळे हर्षद तारळेकर सौरभ बोबडे साहिल वाघवाले अरबाज़ वाघवाले शुभम यादव शुभम मंडावले आदी उपस्थित होते.







