सातारा जिल्ह्यात 134 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर

760
Adv

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात 134 कोटी 38 लाख रुपयांची 35 कामे होणार असून यापैकी 26 कामे प्रगती पथावर आहेत तीन कामांच्या निविदा मंजुरीच्या मार्गावर असून सहा कामे निविदास स्तरावर आहेत अशी माहिती खासदार छ उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे

जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की सातारा जिल्ह्यातील विविध मार्गांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे .म्हणूनच पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सुमारे 174 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कराड, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा, कोरेगाव ,वाई, पाटण या तालुक्यातील कामे असून त्याकरता 134 कोटी 38 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे . एकूण कामे 35 असून पैकी 26 कामे प्रगती पथावर आहेत तीन कामांच्या निविदा मंजुरीच्या स्तरावर असून सहा कामांची निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात आहेत

सातारा तालुक्यातील सहा, कराड तालुक्यातील तीन, पाटण तालुक्यातील पाच, जावली तालुक्यातील दोन, कोरेगाव तालुक्यातील सहा, खंडाळा तालुक्यातील चार, वाई तालुक्यातील चार,मार्गांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत .
खासदार उदयनराजे भोसले यांचे कडून सातारा शहर जिल्ह्यातील दळणवळण आणि आणि सुविधा मिळण्याच्या कामापोटी विशेष पाठपुरावा करण्यात आला होता .केंद्र शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून चांगल्या दर्जाच्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याचा हा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे ही कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जे सहकार्य झाले त्याबद्दल लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या वतीने मी आपला आभार मानतो असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे

Adv