उपाध्यक्ष शेंडे यांनी केली शाहूकला मंदिरची पाहणी ठेकेदाराला दिल्या काम पूर्ण करण्याच्या सूचना

468
Adv

रंगकर्मीचे हक्काचे स्थान असणाऱ्या शाहू कला मंदिराला तातडीने सुरू करण्यासाठी उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी यंत्रणा कामाला लावली अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्यासंदर्भात उपनगराध्यक्षांनी सूचना दिल्या

शाहू कला मंदिराच्या दर्शनी भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासंदर्भात ठेकेदाराला काम सुरवात करण्याकरिता तातडीची बैठक घेण्यात आली यावेळी आरोग्य विभाग प्रमुख सुहास पवार, माजी नगरसेवक कल्याण राक्षे पालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच इतर उपस्थित होते .

शाहू कला मंदिराचे नूतनीकरणाचे काम अद्यापही सुरूच आहे . करोना संकमणाच्या निमित्ताने तसेही नाटय प्रयोग बंद असून शाहू कला मंदिर अद्ययावती करणासाठी वर्षभरापासून बंद आहे . खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनंतर उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पुढाकार घेऊन ठेकेदार पालिकेचा बांधकाम विभाग व काही निवडक सहकाऱ्यांना घेऊन तातडीने शनिवारी सकाळी शाहू कला मंदिराची पाहणी केली . स्टेज,डीमर, पडदा व्यवस्था मेकअप रूम, तसेच अपूर्ण व्यवस्था कोणती आहे याचा आढावा मनोज शेंडे यांनी घेऊन तत्काळ त्या पूर्ण कराव्यात अशा ठेकेदाराला सूचना दिल्या . शाहू कला मंदिराची आसन व्यवस्था हायड्रोक्लिनिंगने तत्काळ स्वच्छ करण्यात यावी अशा सूचना उपनगराध्यक्षांनी दिल्या .

प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले अभिनित एका लग्नाची पुढची गोष्ट या सुप्रसिद्ध नाटकाचा प्रयोग दि १९ फेब्रुवारी रोजी शाहू कला मंदिरात होणार आहे तब्बल एक वर्षानंतर प्रशांत दामले यांच्या नाटकाद्वारे शाहू कला मंदिराची तिसरी घंटा वाजणार आहे

Adv