दिवसेंदिवस सातारा शहरात वाहतुकीची कोंडी होत असून मोती चौक ते देवी चौक हे अंतर पार करण्यासाठी तब्बल वीस मिनिट लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते
सर्वसामान्य नागरिकाची गाडी नो पार्किंग मध्ये असली कि दंड होतो क्रेन उचलून घेऊन जाते किंवा जामर लागतो मात्र व्यापारी वर्गाच्या गाड्या भले मोठे ट्रक रस्त्यावर उभे करून ट्राफिक जाम करत असल्याचे चित्र पाहायला मिळते त्यामुळे व्यापारी वर्गाला एक न्याय व सर्वसामान्य ना एक अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे
सणासुदीच्या काळात खणआळी येथील रस्ता हा बंद केला जातो नक्की व्यापाऱ्यांच्या हितासाठी की सर्वसामान्यांच्या हितासाठी याचे उत्तर सातारकर यांना मिळणार का अशी अपेक्षा साताराकर करत आहेत







