(अजित जगताप)
सातारा दि: जागतिक वारसा स्थळ म्हणून अकरा वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा कास पठारावर सध्या फुल उमलण्याचा मोसम अद्यापही सुरू झालेला नाही. तरीही काही व्यवसायिक आपल्या व्यवसायाला बहार येण्यासाठी कास पठारावर फुलं मौसम सुरू झाल्याची चर्चा सोशल मीडिया वर करीत आहेत.परंतु, या ठिकाणी घाई गडबडीत आलेल्या पर्यटकांची फुला अभावी घोर निराशा होत असल्याने पर्यटकांनी खात्री करूनच या स्थळाला भेट द्यावी. तसेच स्थानिक भूमिपुत्र व्यावसायिकांच्या हॉटेल निवासस्थान व गेस्ट हाऊसला प्राधान्य द्यावे अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांकडून होऊ लागलेली आहे. याबाबत निसर्ग अभ्यासक अजित निकम, महेश पवार यांनी वस्तुनिष्ठ माहिती दिली आहे . सन २०१२ पूर्वी मोठ्या प्रमाणात कास पठारावर नैसर्गिक रित्या फुल बहरत होती. या फुलांची मुळे अनेकांना काश्मीरची आठवण होत होती. परंतु ,स्थानिक भूमिपुत्रांना त्याचं फारसं कौतुक नव्हतं. त्यामुळे काही व्यवसायिकांनी या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम, लॉज, हॉटेल निर्मिती करून फुलांपेक्षा पैशाचा बहर आणला होता. कालांतराने पर्यटकांची गर्दी वाढू लागल्यामुळे निसर्ग ओरबडून काढण्यासाठी अनेक जण सज्ज झाले होते. सातारा जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस यंत्रणा व वन्यजीव प्राणी संरक्षण समिती व इतर समिती यांनी आपल्यामुळेच कास पठार बहरले आहे. असा गोड गैरसमज करून घेतला. त्यातूनच नैसर्गिकरीत्या वन्य प्राणी व पाळीव प्राण्यांना बंदी घालण्यात आली. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून सिमेंटचे खांब व तारेचे कुंपण घालण्यात आले. या सर्व घडामोडींमध्ये कास पठार फुलांनी बहरून गेले असताना असताना सुद्धा या सिमेंटचे खांब व लोखंडी जाळीमुळे वीस ते पंचवीस टक्के फुल दरवर्षी उमलत होती. पुन्हा एकदा हाच प्रयोग करण्याची तयारी झाली आहे.
कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे. त्याचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्यात आल्याने सिमेंटची झाडे झुडपे रस्त्यालगत वाढू लागली आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर गरीब भूमिपुत्रांना मजूर म्हणून काम करावे लागत आहे. ही शोकांतिका आहे.
कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध पावले आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची एक हजार ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी म्हणजे ३.९ मैल आहे.या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळत होत्या. आता त्यांची संख्या तीनशे पर्यंत आली असावी. असे अभ्यासू पर्यटकांना मनापासून वाटू लागले आहे. कास पठारावर आय.यू.सी.एनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित केले होते.तसेच प्रादेशिक २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती व येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात. असे नमूद केले होते.
आता देर राया दुरुस्त आया,,, या म्हणीप्रमाणे ही जाळी काढण्यात आली. त्यामुळे पन्नास ते साठ टक्के फुल पुन्हा उमलू लागली होती. आता पुन्हा कोणत्याही शास्त्रीय कारण नसताना तात्पुरत्या स्वरूपाची जाळी बसवण्यात आलेली आहे .सध्या कास पठार म्हणजे जिल्हा प्रशासन, वनविभाग व शासकीय यंत्रणाची प्रयोगशाळा झालेली आहे .यातून लाखो रुपयांचा मलिदा भ्रष्ट मार्गाने वाटेकर्यांपर्यंत जात आहे. त्यामुळे त्याचा फायदा पर्यटक किंवा वाटसरू व स्थानिक भूमिपुत्रांना अजिबात होत नाही. त्यामुळे हौशी पर्यटकांनी या फुलांचा बहर पाहण्यासाठी सप्टेंबरच्या १५ तारखेनंतरच खात्री पटली तरच कास पठारावर प्रवेश केल्यास त्यांना मानसिक व नेत्र सुख लाभणार आहे.
सातारा जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस यंत्रणा व अन्न- औषध प्रशासन अशा जबाबदार घटकांनी कास पठारावरील अधिकृत परवानाधारक हॉटेल , ढाबा, कृषी पर्यटन व अतिक्रमण झालेल्या हॉटेलची यादी प्रसिद्ध करून पर्यटकांनी सावध रहावे. अशी सक्त सूचना प्रसार माध्यमाद्वारे प्रसिद्ध केली तरच खऱ्या अर्थाने येथील अतिक्रमण रोखू शकते. अन्यथा अतिक्रमण कायमस्वरूपी करण्यासाठी काही दलाल हे पुष्पगुच्छ देऊन अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर उभे आहेत. त्यामुळे स्थानिकांनी याबाबत काही दलाल व नेते यांना बाजूला करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आता स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे.
—————————————&&—————————-
महत्वाची चौकट—- कास पठारावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण पसरलेले आहे या अतिक्रमणावर जेसीबी व हातोडा पडावा यासाठी पुण्यातील राष्ट्रीय हरित करण्यात न्यायाधीकारणात याचिका करते सुजित आंबेकर सुशांत मोरे यांनी जेष्ठ वकील एडवोकेट असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा अतिक्रमण झालेल्या हॉटेल व गेस्ट हाउस वर नोटीसा काढलेले आहेत परंतु अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे आता लोकशाही मानणाऱ्या पर्यटकांनी अशा हॉटेल वगैरे व घोषित बंदी घालावी तरच त्यांना पायबंद बसेल अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केलेली आहे