जनता सह बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी

579
Adv

सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी, सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असणा-या जनता सहकारी बँकेमध्ये रिझवर्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशाप्रमाणे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा बँकेच्या मुख्य कार्यालयात होऊन सर्व सदस्यांनी विचारविनिमय करुन बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी बँकेचे पॅनेलप्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली.

रिझवर्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे संचालक मंडळाने एकूण 5 निकष पूर्ण करणा-या पात्र सदस्यांची बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यपदी सर्वानुमते निवड केली. त्यात बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, माजी चेअरमन व विद्यमान संचालक विनोद कुलकर्णी, जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य, कायदेतज्ञ अॅड. चंद्रकांत बेबले, टॅक्स कन्सलटंट विनय नागर, एम.बी.ए. पदवीधारक व बँकेचे विद्यमान तज्ञ संचालक ओंकार पोतदार, बी.एस.सी. अॅग्री पदवीधर व कृषीतज्ञ केतन जगदाळे यांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना बँकेचे ज्येष्ठ संचालक आनंदराव कणसे यांनी आपले मत व्यक्त करताना श्री. विनोद कुलकर्णी हे गेली 10 वर्षापासून बँकेच्या सत्ताधारी भागधारक पॅनेलचे प्रमुख म्हणून कामकाज पहात असून त्यांनी यापूर्वी बँकेचे चेअरमनपदही भूषविलेले आहे. त्यामुळे श्री.कुलकर्णी यांच्या सहकारी बँकिंग क्षेत्रातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव व ज्ञानाचा उपयोग जनता सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी बँकेचे विद्यमान चेअरमन अतुल जाधव, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक माधव सारडा, माजी व्हाईस चेअरमन अविनाश बाचल यांच्याहस्ते नवनिर्वाचित     बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक म्हणून नावलौकिक असणा-या व बँकिंग स्पर्धेत विविध प्रकारच्या आव्हांनाना व सुधारणांना सामोरे जात स्वतःचे अस्तित्व टिकवणा-या जनता सहकारी बँकेची यशस्वी वाटचाल यापुढेही कायम ठेवू अशी ग्वाही देऊन संचालक मंडळाने आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सर्वजण साथ ठरवू असे नमूद केले.

याप्रसंगी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शास्त्री यांनी प्रस्तावना करुन बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या नवनिर्वाचित सदस्यांचा पात्र परिचय करुन दिला.

Adv