पोलीस हवालदार संजय साबळे यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस 11 हजार मुख्यमंत्री सहायता निधीला  देऊन केला साजरा

75
Adv

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज सातारा शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार संजय साबळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 हजार रुपयांची मदत केली आहे.

श्री. साबळे यांच्या आज लग्नाचा वाढ दिवस या निमित्ताने त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी 11 हजार रुपयांचा स्टेट बँक ऑफ इंडियाचा धनादेशत आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला आहे. श्री. साबळे यांनी कोरोना संकटाच्या काळात केलेल्या मदतीचे पोलीस विभागात कौतुक होत आहे.

Adv