खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार राधिका रोड रस्त्याच्या कामाची पाहणी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट इंजिनीयर सुधीर चव्हाण यांनी संयुक्तरीत्या आज केली
रस्ते अनुदान योजनेतून कोटेश्वर मंदिर ते राधिका रोड अखेर रस्त्याचे काम चालू आहे याची पाहणी विद्यमान सातारा पालिकेचे लोकप्रिय युवा उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केली रस्त्याचा दर्जा कसा चांगला होईल म्हणून ही पाहणी केली असून राधीका रोड या रस्त्यावरून शेकडो लोकांची ये-जा चालू असते शहरातील महत्त्वाचा रस्ता म्हणून राधिका रोड कडे पाहिले जाते पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था झाली होती सदरचा रस्ता हा आता दर्जेदार होणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली
रस्त्याच्या बाजूला गटर काम तदनंतर सदरचा रस्ता अशी कामाची वर्गवारी असून सातारकरांना येत्या काही दिवसातच राधिका रोड हा उच्च दर्जाचा व सुस्थितीत पाहिला मिळेल असा ठाम विश्वास उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी यावेळी सातारानामाशी बोलताना व्यक्त केला