
सातारा जिल्ह्यातील ६५ निवडणूक विभाग व १३० निर्वाचक गणांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदस्य संख्या निश्चीती व प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यास अनुसरुन, सातारा जिल्ह्यातील ६५ निवडणूक विभाग व १३० निर्वाचक गणांवर दि. १४ जुलै रोजी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करणेत आलेली आहे.
दि.१४ जुलै ते दि.२१ जुलै अखेर निवडणूक विभागावर ५६ व निर्वाचक गणावर ४४ अशा एकूण १०० हरकती प्राप्त झालेल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी झुंबर हॉल, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे येथे दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता घेणेत येणार आहे. ज्या व्यक्तींनी प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती घेतलेल्या आहेत त्यांनी वरीलप्रमाणे नमुद ठिकाणास व दिनांकास वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.