नगर विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 36 कर्मचाऱ्यांना सहावा, सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी आमदार साहेबांनी ही प्रयत्न केले होते म्हणून सातारा पालिकेतील 36 कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सुरुची बंगला येथे जाऊन सत्कार करण्यात आला
तब्बल अठरा वर्षापासून आस्थापनेवर येण्यासाठी झगडणाऱ्या छत्तीस कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षापासून रखडलेल्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला आहे .आस्थापना विभागाने वेतन निश्चिती करून याच महिन्यात वाढीव वेतन देण्याचे संकेत दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे . नगर विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 36 कर्मचाऱ्यांना सहावा, सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी मंत्रालयात याबाबत मिटींगही आयोजित केली होती असे काही सदस्यांनी सांगितले
सत्कार करताना पालिकेचे प्रकाश शिर्के, प्रशांत निकम देविदास चव्हाण बांधकाम विभागाचे श्री वायदंडे, आदी मान्यवर उपस्थित होते