पिंपोडे बु ॥ मध्ये पुन्हा कोरोनोचा शिरकाव – बाजारपेठ आज पासुन ७ दिवस बंद

40
Adv

उत्तर कोरेगांव मधील पिंपोडे बु येथील व्यापारी बाजार पेठेच्या ठिकानी राम वार्डा मधील स्थानिक दोंघांना कोरोनो पॉजीटीव असल्याचा रिपोर्ट रात्री उशीरा आले मुळे सकाळी नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते त्यामुळे प्रशासनाने अनेक ठिकानी लॉकडाऊन करून पुढील अनर्थ होऊ नये यासाठी खबरदारीची बाब म्हणून उपाययोजना केल्या आहेत सदर कोरोनो चा फैलाव होऊ नये म्हणून,नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोरेगांव च्या तहसिलदार रॊहिनी शिंदे यांनी केले आहे व ग्रामपंचायतीच्या वतीने ७ दिवस व्यापारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
याबाबत पिंपोडे बु ॥ ता कोरेगांव येथे यापूर्वी तिन रूग्न कोरोनो पॉजीटिव्ह सापडले होते मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटि०ह आलेने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते मात्र काल रात्री उशीरा दोन स्थानिक रूग्नांचे रिपोर्ट पॉजीटि०ह आलेने याठिकानी नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे,त्यामुळे हे रुग्न कोणा कोणाच्या संपकार्त आले याची चौकशी संबधीत खात्याकडुन सुरु असुन,हे रुग्न ज्यांच्या संपर्कात आले त्यांच्यात भितिचे वातावरण पसरले असुन संबधीत प्रशासन सखोल चौकशी करत आहे
पिंपोडे बु ॥ येथील राम वार्डासह अनेक ठिकानी ग्रामपंचायत कोरोनो ग्रामदक्षता समिती,व महसुल खाते यांच्या सह मंडलाधिकारी तलाठी,ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य,यांनी शासन नियमा प्रमाणे नागरीकांच्या सुरक्षे च्या दृष्टीकोनातून पिंपोडे बु ॥ लॉकडाऊन केले असुन नागरीकांनी स्वःताची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क बांधणे,सुरक्षित अंतर ठेवणे,व विमाकारण घराबाहेर पडु नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे

Adv