अन माढा मतदारसंघातून काढला जाणकारांनी पळ*..

457
Adv

माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजीत निंबाळकर यांचा दोन लाखाच्या फरकाने पराभव करणार अशी वलगना कालच महादेव जानकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केली होती दुसऱ्या दिवशी त्यांनी एक प्रकारे महायुतीच्या छत्रछायेखाली राहुन माढा लोकसभा मतदारसंघातून पळ काढला असल्याचे बोलले जात आहे

महादेव जानकर यांनी आपण माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे ठाम बोलले होते येणाऱ्या विधानसभेत ही महायुतीला बराच परिणाम राजसभेच्या मुळे होऊ शकतो अशी वलगणा केली होती शरदचंद्रजी पवार संजीवराजे नाईक निंबाळकर,विजयसिंह मोहिते पाटील,आदी मान्यवरांची भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातून जानकर यांनी शड्डू ठोकला होता नक्की कोणत्या गोष्टीवर महादेव जानकर यांनी महायुतीशी सेटलमेंट केली हे कोडे मात्र शिमग्याचे दिवशी कळले नसल्याने महादेव जानकर यांच्यावरचा विश्वास उडाला असल्याचे माढा सह साताऱ्यातील जनता सर्वसामान्य जनता चर्चा करताना दिसून येते

मी त्यागी आहे भोगी नाही असे वक्तव्य ही जानकर यांनी केले होते नक्की सत्तेचे भोगी कोण हे येणाऱ्या काळात कळेलच मात्र निम्मा महाराष्ट्र पिंजून काढून माढा लोकसभा मतदारसंघाचे दावेदारी महाविकास आघाडी कडून जाहीर होण्याच्या आधीच महादेव जानकर यांनी आपला रंग बदलल्याने लोकसभेला जाणकार उभे राहिले तर आणि अपेक्षित निर्णय लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे

शरदचंद्रजी पवार व माढा मतदारसंघाचे केले जानकरांनी भांडवल?
महायुतीवर राजकीय दबाव आणण्यासाठी महादेव जानकर यांनी जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार व माढा मतदारसंघाची ढाल बनवली व महायुतीच्या नेत्यांकडे जाऊन ऐनवेळी आपली राजकीय सेटलमेंट करून 24 तासाच्या आतच जानकर यांनी आपण केलेले स्टेटमेंट बदल यू टर्न घेतला असल्याचे दिसून येते

Adv