फलटण व अकलूजकरांचा खा निंबाळकरांनी घेतला धसका

432
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1,"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Adv

भाजपचे माजी नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला भारतीय जनता पार्टीचा सर्व पदांचा राजीनामा पक्षाकडे पाठवला मात्र राजीनामाच्या 24 तासाच्या आतच खा नाईक निंबाळकर यांनी नागपूर गाठल्याने त्यांना आता धोका दिसू लागले असल्याचे बोलले जात आहे

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व विजयसिंह मोहिते पाटील या दोन्ही कुटुंबीयांची राजकीय ताकत माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठी अतिशय महत्वाची असल्याने खासदार नाईक निंबाळकर यांनी थेट विमानाने नागपूर गाठले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपले काम करत नाहीत असाच पाढा वाचला असल्याचे सध्या तरी चित्र दिसून येते मात्र खा रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रचार करत असताना फलटण मध्ये हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री संजीवराजे नाईक निंबाळकर व श्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबियांकडे प्रचाराच्या निमिताने गेले नसल्याने हा वाद आणखीनच ताणला गेला नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फटका माढा लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराला बसणार असे चित्र निर्माण झाल्याने खासदारांची पळापळ सुरू झाली असल्याचे माढा मतदारसंघातील जाणकारांचे मत व्यक्त केले आहे

उमेदवारी जाहीर झाल्यापासून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनि बरीच टीका टिपणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवर याच्या विरोधात केली या प्रकरणी श्रीमंत रामराजे निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनि जाहीर नाराजी व्यक्त केली मात्र फलटण येथे झालेल्या दोन मेळाव्याची दखल महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणीही घेतली नसल्याची दिसून आली खा नाईक निंबाळकर यांनी एक प्रकारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व मोहिते पाटील त्यांच्या राजकीय ताकतीचा धसकाच घेतला असल्याचे बोलले जात आहे

Adv