अपघात झाल्यानंतर ही आमदार गोरे यांचा सतर्कपणा

872
Adv

आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाल्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी खासदार रणजीतसिंह नाई निंबाळकर फलटणचे युवानेते सुशांत निंबाळकर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख ,आमदार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांच्याशी संपर्क साधला…संपर्क साधल्यानंतर सुशांत निंबाळकर Dysp तानीजी बर्डे व त्याचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने आमदार जयकुमार गोरे यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले अपघात झाल्यानंतर आमदार गोरे यांनी संबंधित लोकांशी संपर्क साधल्याने त्यांचा सतर्कपणा दिसून आला

फलटण शहराजवळील स्मशानभूमी येथील बानगंगा नदी पुलावर आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला होता अपघात झाल्यानंतर गाडी जवळपास 50 फूट खोल कोसळली आमदार जयकुमार गोरे यांनी दोन-तीन व्यक्तींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही रात्री पावणेतीनच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांचा सुशांत निंबाळकर यांच्याशी संपर्क झाला त्यानंतर भाजपचे युवा नेते सुशांत निंबाळकर हे घटनास्थळी दाखल झाले व अपघात ठिकाणाहून आमदार जयकुमार गोरे यांना सुखरूप बाहेर काढण्यात सुशांत निंबाळकर यांना यश आले सुखरूप बाहेर काढल्यानंतर खासदार निंबाळकर युवा नेते सुशांत निंबाळकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांना फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात केले होते दाखल

आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाल्याचे समजताच खासदार रणजितसिंह निंबाळकर हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते अपघातानंतर फलटण येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये आमदार जयकुमार गोरे यांचे सिटीस्कॅन करण्यात आले रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर आमदार गोरे यांना पुणे येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले

रात्री तीन वाजता अपघात नेमके कुठे झाला हे समजत नव्हते एका पुलावरील बॅरिकेट तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने आम्हाला अंदाज आला की संबंधित घटना येथे घडली आहे आम्ही पूर्ण चिखल तुडवत घटनास्थळी दाखल झालो व आमदार गोरे यांना गाडीतून बाहेर काढण्यात आम्हाला यश आले

सुशांत निंबाळकर यांची प्रतिक्रिया

Adv