कोयना धरणग्रस्त लोकांच्या प्रश्नासाठी एकत्र या …

74
Adv

कोयनानगर येथे कालवा सल्लागार समितीची बैठक मा. ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली त्यामध्ये प्रामुख्याने कोयना धरणातून आणि इतर धरणांमधून सिंचनासाठी पाणी देण्याबाबत चर्चा झाली ज्या पाणी पुरवठा संस्थांना सिंचनासाठी पाणी कमी पडत असून त्यांची वाढीव पाण्याची मागणी असेल तर त्यांना पाणी देण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीला सातारा जिल्हामधील मा. ना. शंभूराज देसाई, मा. ना. जयकुमार गोरे, मा.ना.शिवेंद्रराजे भोसले, मा.ना.मकरंद पाटील , आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे, यांची उपस्थिती होती.
परंतु ज्या कोयना धरणामुळे सगळा भाग सुजलाम सुफलाम झाला त्या कोयना धरणग्रस्तांबाबत त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हातील सर्व मंत्री आणि आमदार एकत्र येऊन बैठक घेतील का असा प्रश्न कोयना धरणग्रस्त लोकांना पडलेला आहे . गेली 65 वर्षापासून कोयनेचा प्रश्न प्रलंबित आहे, बैठकावर बैठका होत आहेत परंतु त्या निर्णयावर अंमलबजावणी काही होत नाही.
पिढ्यान् पिढ्या कोयना धरणग्रस्तांच्या वाट्याला नैराश्य येतं आहे कित्येक सरकार आली आणि गेली परंतु प्रश्न जैसे थे आहेत.
सातारा जिल्हाला चार मंत्री पद मिळाली आहेत त्यामुळे आता तरी आपले विषय सुटतील अशी आशा धरणग्रस्तांना आहे त्यामुळे जिल्हातील सर्व मंत्री महोदयांनी कोयना पुनर्वसन बाबत एकत्रित बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जलसंपदा मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात कोयना पुनर्वसन चा विषय सुटत नाही तो पर्यंत कोयना प्रकल्पाची जमीन इतर कोणत्याही प्रकल्पाला, योजनेला देऊ नये, कोयना जलाशयात बुडीत बंधारे मंजूर करावेत, महानिर्मिती च्या धर्तीवर जलसंपदा विभागाने प्रकल्प ग्रस्तलोकांसाठी योजना चालू करावी, गोकुळ, रासाटी,हेळवाक या गावांना विशेष बाब म्हणून पुनर्वसन चे लाभ द्यावेत, प्रकल्पग्रस्तांना व्यवसायासाठी जागा भांडवल उपलब्ध करून द्यावे, जलाशया मध्ये नौका विहार चालू करावे, कोयना प्रकल्पाच्या संपदित जागा विनावापर वापर पडून आहेत त्या अतिरिक्त ठरवाव्यात अशा महत्वाच्या विषयांसह वीस प्रश्नांचे निवेदन कोयना धरणग्रस्त संग्राम संघटने मार्फत देण्यात आले यावेळी सचिन कदम, महेश शेलार, विनायक शेलार, राजाराम जाधव, संदीप देवरुखकर, दिनेश देसाई, उपस्थित होते.

Adv