खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश सातारा पालिकेच्या 36 कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ

106
Adv

तब्बल अठरा वर्षापासून आस्थापनेवर येण्यासाठी झगडणाऱ्या छत्तीस कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षापासून रखडलेल्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला आहे .आस्थापना विभागाने वेतन निश्चिती करून याच महिन्यात वाढीव वेतन देण्याचे संकेत दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे . सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी 36 कर्मचाऱ्यांना सहावा, सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी प्रयत्न केले व त्याला आज यश आल्याचे दिसून आले

छत्तीस कर्मचाऱ्यांनी गुरुवारी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेऊन त्यांना मनापासून धन्यवाद दिले .पेढे भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले नगरसेवक दत्तात्रय बनकर नगराध्यक्ष माधवी कदम उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे पुष्पगुच्छ व पेढे देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले . कायम आस्थापना विषयाचा या कर्मचाऱ्यांचा कामगार न्यायालयात अद्यापही लढा सुरू आहे .

2016 मध्ये तत्कालीन नगरविकास राज्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या पदरचनेच्या अपिलाला अंशतः मान्यता दिली होती मात्र तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी कर्मचाऱ्यांनी आस्थापनेची पत्रे दिली मात्र वेतन निश्चितीचा लाभ दिला नाही मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी २३ जुलै रोजी पदभार स्वीकारताच 36 कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीच्या कामाला गती येऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले . कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगा प्रमाणे 3050-4590 वेतनश्रेणी लागू झाली होती . आता त्यांना 19900-63200 ही वेतन श्रेणी लागू झाली आहे . प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारात तब्बल पंधरा हजार रुपयांची वाढ झाली आहे . त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे .

Adv