राष्ट्रवादीत पुन्हा श्री रामराजे नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

1263
Adv

शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात पक्ष पूर्ण ताकतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभा असल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्यासह मंत्री मकरंद पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित दादांनी कानमंत्र दिला असल्याचे खात्री लायक शिर्डी येथील सूत्रांचे वृत्त आहे

लोकसभा विधानसभा निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अदृश्य होते दोन्हीही निवडणुकीत आमच्यावर अन्याय होते पक्षाने योग्य ते निर्णय घेऊन कारवाई करावी अशी मागणी त्यांनी मेळाव्याद्वारे केली होती मात्र विधानसभेला उमेदवारी जाहीर होऊन वेगळा विचार त्यांच्या आमदारांनी केला त्यांना पराभवाला समोर जावे लागेल त्यानंतर फलटण तालुक्यात शुकशुकाट होता मात्र पराभवाची मरगळ झटकत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे थेट राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील अधिवेशनात पोहोचले थेट अजितदादांशी संवाद साधत आपल्या अडीअडचणी व व्यथा सांगून मनमोकळे केले

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मंत्री मकरंद पाटील यांना उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितले की राष्ट्रवादी पक्ष व आम्ही सर्व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबरोबर असून येणाऱ्या काळात सर्व ताकतीने त्यांच्या पाठीमागे उभे असून सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रक्रियेमध्ये घेऊन त्यांना पक्षाचे कामकाज करावे अशा सूचना दिल्या असल्याचे शिर्डीतील सूत्रांकडून समजते येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्षांमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पुन्हा सक्रिय होणार की नाही हे येणाऱ्या काळातच कळेल

Adv