उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा सविस्तर आढावा घेतला महायुती म्हणून निवडणूक लढण्यासाठी मंत्री मकरंद पाटील यांना अधिकार दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज मुंबई येथे राष्ट्रवादीची बैठक संपन्न झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष चाकणकर मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन काका जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकरआदी मान्यवर उपस्थित होते
फलटणचे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे पाटील या बैठकीला उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले आहे
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी सविस्तर आढावा दिला असून जिल्ह्यात महायुती म्हणून निवडणुका लढाईच्या असतील तर मंत्री मकरंद पाटील यांना सर्वअधिकार दिले गेले आहेत पण पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे
नवीन चेहऱ्यांना संधी द्या व राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित ठेवा अशा सूचना अजित दादांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे






