माळशिरस येथील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या मार्गदर्शनाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ज्या पक्षातून आमदार सचिन कांबळे पाटील निवडून आले त्या पक्षासाठी इतर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी करताना न दिसल्याने नेमक्या आमदार राष्ट्रवादीचे का भाजपचे असाच प्रश्न उपस्थित होत आहे
आमदार सचिन कांबळे पाटील मार्गदर्शन करताना चा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे
माळशिरस येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते मात्र यात विशेष उपस्थिती होती ते अजित दादा गटाचे फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे पाटील यांची कार्यकर्ता मेळावा भाजपचा आणि मार्गदर्शन राष्ट्रवादीच्या आमदाराचे त्यामुळे नक्की हे आमदार राष्ट्रवादीचे का भाजपचे असाच प्रश्न उपस्थित होत आहे
अजित दादांच्या अथक प्रयत्नाने फलटण मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला मात्र या विद्यमान आमदार महोदयांना भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही संभ्रम निर्माण झाला आहे