
विधानसभा,जिल्हा बँक,लोकसभा पुन्हा विधानसभा असा पराभवाचा सामना शशिकांत शिंदे यांना करावा लागल्याने पराभवाचा एक प्रकारे चौकारच झाला असल्याची काल चर्चा जिल्ह्यात रंगत होती
गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले तेथूनच त्यांच्या पराभवाच्या मालिकेला सुरुवात झाली त्यानंतर जिल्हा बँक निवडणुकीत अवघ्या एकमताने त्यांचा निसटता पराभव झाला पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत निष्ठावंत शिलेदार म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांनी शड्डू ठोकत उमेदवारी मिळवली पण जिल्हा वासियांनीही त्यांना पराभवाची हॅट्रिक घडवून दिली या हॅट्रिकची सल मनातून जात नाही तोपर्यंत त्यांनी विधानसभा निवडणुक लढवण्याचा शड्डू ठोकून सुरुवात केली तब्बल 43 हजार मतांनी विक्रमी विजय मिळवत महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा चौकार मारण्यास भाग पाडले
सलग चौथा पराभव झाल्याने आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मध्ये तीव्र नाराजी असून नक्की कायचुकलं आमदार शिंदे यांच्या पहिल्या फळातील नेते व सर्वसामान्य कार्यकर्ते घेत आहेत मात्र पराभवाचा चौकार बसल्याने यातून बोध घेणार का अशी चर्चा रंगत आहे
सातारा तालुक्यातून लीड मिळणार अशी अपेक्षा आमदार शशिकांत शिंदे सह प्रमुख कार्यकर्त्यांना होती यां विधानसभा मतदारसंघात बरेच पाणी पुलाखालून गेली मात्र अनपेक्षित अशी आघाडीच या सातारा तालुक्यातून सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासूनच महेश शिंदे यांच्याबरोबर राहिली असल्याने एक प्रकारे लोकसभेचा वाचपाच या कार्यकर्त्यांनी काढला असल्याचे दिसून आले