
धैर्यशील कदम,पुरुषोत्तम जाधव या दोन्हीही जिल्हाध्यक्षांचा महायुतीने विधानसभेचे तिकीट नाकारून करेक्ट कार्यक्रम केला असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे
महायुतीत भाजप व शिवसेना हे दोन पक्ष सत्तेत असून यांच्याच पक्षातील जिल्हाध्यक्ष असलेले धैर्यशील कदम हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक होते पण महायुतीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वे केल्यानंतर मनोज घोरपडे सरस असल्याचे दिसून आले पक्षात अंतर्गत कुरघोडी केल्याचा ठपकाही कराड उत्तर विधानसभेसाठी कळीचा मुद्दा ठरला
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले पुरुषोत्तम जाधव यांना तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष जिल्हा नियोजन अशी पदे दिली मात्र यांची तहान भागत नसल्याने पक्षाशी गद्दारी ? करून त्याच महायुतीच्या विरोधात शड्डू ठोकला आहे या जिल्हाध्यक्षांना ना पक्ष वाढवण्यात आला ना कार्यकर्त्यांन न्याय देण्यात आला मुख्यमंत्री शिंदेंनी या जिल्हाध्यक्षांच्या करेक्ट कार्यक्रम केला असे त्यांचेच शिवसैनिक आज म्हणत आहेत