
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हेच सातारा जिल्ह्यातील महायुतीचे लोकसभेचे उमेदवार असल्याचे आज जाहीर करण्यात आले त्यामुळे आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांची थेट लढत होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित होते गेल्या एक वर्षभरापासून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून संसदेत निवडून जाणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार जाहीर होताच व्यक्त केला आहे
भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवडीने जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीसह सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी सातारा जिल्ह्यात फटाक्याची आतिषबाजी केली व येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय होणार असा विश्वास सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला