राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची किल्ले प्रतापगडाला भेट

250
Adv

सातारा दि. 5 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज किल्ले प्रतापगडला भेट देऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन मनोभावी पुजा केली. यानंतर त्यांनी किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी किल्ले प्रतापगड येथील ग्रामस्थांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत केले.

*शिवकालीन खेडेगाव व हस्तकला केंद्रास राज्यपालांची भेट*

प्रतापगड माची येथील शिवकालीन खेडेगाव व हस्तकला केंद्रास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली.

शिवकालीन खेडेगाव भेट देवून शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष अनुभुती मिळाली. हे स्थळ प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वीर सैनिकांना अभिवादन अशा भावना त्यांनी या भेटी प्रसंगी व्यक्त केल्या.

*महाबळेश्वर येथील सनसेट पॉईंटला राज्यपालांची भेट*

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सनसेट पॉईंटला भेट दिली. याभेटी प्रसंगी पर्यटनासाठी आलेल्या लहान मुलांशी त्यांनी संवादही साधला.
00000

Adv